आजचा मथळा 4 जुलै: आज घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या |2022

मुंबई : एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील सर्व घडामोडींची पहिली बातमी देण्याचा प्रयत्न करत आहे. हे राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडीपासून ते आजच्या क्रीडा आणि मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टींचे अपडेट प्रदान करण्याचा प्रयत्न करते. आमच्या प्रेक्षकांना अद्ययावत ठेवण्याचा एक भाग म्हणून, आम्ही तुम्हाला दिवसभर काय चालले आहे याची माहिती देत ​​आहोत.

आज बहुमत चाचणीचा दिवस, शिंदे सरकारसाठी कसोटीचा
आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचे आहे. काल विधानसभेच्या निवडणुकीत सरकार पहिल्यांदाच जिंकले. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. सकाळी 11 वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरू होईल, बहुमत चाचणी आवाजी मतदानाने होईल.

कोणाचा व्हीप लागू होणार?
विधानसभा अध्यक्षपदासाठी व्हीपच्या विरोधात मतदान करणाऱ्या ३९ आमदारांच्या निलंबनाची मागणी शिवसेनेने केली आहे. शिंदे गटाने 16 आमदारांना व्हीपविरोधात मतदान करण्याचे पत्रही दिले आहे. त्यामुळे आता हा लढा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला धक्का, एकनाथ शिंदे गटनेतेपदी कायम
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेला आज मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते असतील, असे पत्र विधिमंडळ सचिवालयाने दिले असून, शिवसेनेचे भरत गोगावले यांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून केलेली नियुक्तीही रद्द करण्यात आली आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

खातेवाटपावरून आज शिंदे-भाजप बैठक
मंत्रिमंडळ वाटपाबाबत भाजप शिंदे गटासोबत बैठक घेणार आहे. सायंकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपच्या कोअर कमिटीसह केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांचे नाव निश्चित?
काल रात्री शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे कळते. आज विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

बंडानंतर शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक
शिवसेना सर्व जिल्हाप्रमुखांची आज दुपारी 12 वाजता सेना भवनात बैठक होणार आहे. मुंबईतील विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी ७ वाजता मातोश्रीवर होणार आहे. शिवसेनेतील गटबाजीनंतर या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मेधा सोमय्या बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना समन्स
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या दाम्पत्याचा शौचालय घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांना सकाळी 11 वाजता शिवडी न्यायालयात हजर व्हायचे आहे.

अमरावतीत कोल्हे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा
व्यापारी कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी 11 वाजता अमरावतीतील राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने लोक जमा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध करत जमाव शांततेत घोषणाबाजी न करता त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. या वेळी भाजप, विहिंप, बजरंग दल, अमरावतीतील व्यापारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत. या हत्येतील मुख्य आरोपी इरफान शेख वगळता सहाही आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार आहे. या सहा आरोपींना आज अमरावती न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वेळेवर अपडेट्स
आज संत ज्ञानेश्वरांची पालखी बरड येथून निघून नाटेपुते येथे थांबणार आहे. संत तुकारामांची पालखी इंदापूरहून निघून सराटी येथे थांबणार आहे.

ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे
उन्हाळी सुट्टीनंतर आज या खटल्याची सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी राजू यांच्या 30 फूट उंचीच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. रात्री 11 वाजता हा कार्यक्रम होईल त्यानंतर मोदी गुजरातला जातील. मोदी गांधीनगरमध्ये पीएम डिजिटल वीक 2022 चे उद्घाटन करतील. कार्यक्रम संध्याकाळी 4.30 वाजता आहे.

content & image courtesy : ABP MAZA

डिसक्लेमर
‘या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्री/गणनाची अचूकता किंवा विश्वसनीयता हमी नाही. ही माहिती विविध माध्यमे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / धर्मग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे. आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे, त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, त्याचा कोणताही वापर वापरकर्त्याची स्वतःची जबाबदारी असेल. ‘

Disclaimer
‘The accuracy or reliability of any information/material/calculation contained in this article is not guaranteed. This information has been brought to you by collecting from various mediums / astrologers / almanacs / discourses / beliefs / scriptures. Our purpose is only to deliver information, its users should take it as mere information. In addition, any use thereof shall be the responsibility of the user himself.’

meher

Welcome to https://varor.in/, your number one source for all things products. We’re dedicated to providing you the very best of images and other information, with an emphasis on clear vision. Founded in 2014 by Meher, https://varor.in/ has come a long way from its beginnings in varor. When meher first started out, his passion for photography in varor village cleaning to start their own business.

Leave a Reply

Your email address will not be published.

close

Ad Blocker Detected!

Refresh